Pune : चंदननगर येथील एका सोसायटीमधील इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला भीषण आग 

एमपीसी न्यूज : पुण्यातील (Pune) चंदननगर येथील एका सोसायटीमधील इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीच नेमक कारण समजू शकले नाही.

Dighi : उघड्या दरवाजावाटे घरातून दोन लॅपटॉप पळवले

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर येथील विशाल दिप रेसिडंन्सी सोसायटीमधील तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मरला सकाळी दहा वाजता आग लागल्याची घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच काही मिनिटात घटनास्थळी धाव घेऊन काही मिनिटात आग आटोक्यात आणली. या आगीच्या घटनेमध्ये इलेक्ट्रिक ट्रॉन्सफॉर्मर जळून खाक झाला असून आगीच नेमक कारण समजू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.