Dighi : उघड्या दरवाजावाटे घरातून दोन लॅपटॉप पळवले

एमपीसी न्यूज – उघड्या दरवाजा वाटे घरातून अज्ञात चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 18 जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी सव्वा एक वाजताच्या कालावधीत डुडुळगाव आळंदी येथे घडली.

Wakad : बनावट औषध विक्री प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

 

साईराम तुलसीराम राठोड (वय 22, रा. डुडुळगाव, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा उघडा असताना उघड्या दरवाजावाटे आत मध्ये प्रवेश करून 55 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी 22 जुलै रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिघी (Dighi) पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.