Alandi : आळंदीतील शाळेत एका शिक्षकाने वारकरी विद्यार्थ्यांच्या गळ्यातील माळा तोडल्याचा प्रकार :वारकरी संप्रदायाने केले माफ

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) मधील श्री ज्ञानेश्वर विद्यालयामधील एका शिक्षकाने 2 विद्यार्थ्यांच्या गळ्यातील माळा तोडल्याची घटना घडली. त्याचे संबंधित वृत्त एका वारकरी संबंधित युट्युब (न्युज) वाहिनीने दि.14 रोजी प्रसारित केले.

Alandi – आळंदीत “माझी माती, माझा देश”अभियान

ते दोन विद्यार्थी श्री कृष्ण वारकरी संस्थे मधील असून त्या विद्यार्थ्यांची नावे तन्मय लक्ष्मण शिंदे (इयत्ता 5 वी )किरण साहेबराव मदगे (इयत्ता6 वी )अशी आहेत. संबंधित एका विद्यार्थीनी त्या वृत्त वाहिनीला माहिती देताना सांगितले.  सर आले त्यांनी आम्हाला रांगेत केलं, आमच्या माळा चेक केल्या. माझ्या गळ्यात माळ सापडली त्यांनी डायरेक्ट ती तोडली.

दुसऱ्या विद्यार्थ्यांने सुद्धा यांनी माळ तोडल्याचे सांगितले. काही विद्यार्थ्यांच्या सुद्धा माळा तोडल्याचे त्याने सांगितले. संबंधित वृत्ताची आळंदी शहरात मोठी चर्चा झाली . व संबंधीत प्रकाराची दि.15 ऑगस्ट रोजी श्री ज्ञानेश्वर विद्यालयात त्या संस्थेचे काही पदाधिकारी ,शिक्षक , मुख्याध्यापक व काही वारकरी संप्रदायातील महाराज यांची बैठक झाली.

त्या बैठकी नंतर यावर प्रतिक्रिया देताना ज्ञानेश्वर विद्यालयाच्या प्रांगणातून संग्राम बापू भंडारे म्हणाले, ज्ञानेश्वर विद्यालयात वर्षांनवर्षे आध्यात्मिक शिक्षण घेणारी , अनेक विद्यार्थी शालेय शिक्षण घेण्यासाठी येतात . एव्हढ्या वर्षांचा ज्ञानेश्वर विद्यालयाचा इतिहास पाहायला ज्ञानेश्वर विद्यालयात महाराज मंडळींसाठी अनुकूल वातावरण आहे.

अध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्यांची अजून अध्यात्मिक उन्नती व्हावी. यासाठीच या विद्यालयाचे नाव ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने ज्ञानेश्वर विद्यालय, असे आहे. तसेच ज्ञानेश्वर महाराज यांचा भव्य पुतळा प्रांगणात आहे.

हरिपाठ, ज्ञानेश्वरी व वारकरी संप्रदायाचे संस्कार या विद्यालयात वर्षांनुवर्षे दिले जातात. दोन दिवसा पूर्वी वैयक्तिक शिक्षक व दोन चार विद्यार्थी समज गैरसमज  झाला. त्याच्यातून माळ तुटली,तोडल्या गेली असे समज गैरसमज  झाले. त्या विद्यार्थ्यांनी संस्थेत तक्रारी केल्या. मीडिया वाल्यांनी बातम्या बाहेर आणल्या. आज आम्ही विद्यालयात आलो तेव्हा इतिहास पाहता ज्ञानेश्वर विद्यालयाचा इतिहास स्वच्छ आहे. दोन दिवसा पूर्वी काही समज गैरसमज झाले असतील, आम्ही सगळे मंडळी बसलो. आमची सकारात्मक चर्चा झाली. माझी या माध्यमातून विनंती आहे घटना घडत असतात किंवा घडत ही नसतात. समज गैरसमज होत असतात.

त्यातून सुवर्ण मध्य काढणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. ज्ञानेश्वर महाविद्यालय निष्कलंक आहे.हे सर्वांना मान्य कराव लागेल किमान संप्रदायाच्या बाबतीत.म्हणून येथून पुढे शब्द दिला गेला आहे जरी समज गैरसमज झाले  असतील तरी सुद्धा सगळ्या शिक्षकांशी पुन्हा संवाद केला जाणार आहे.

त्यातून अजून सकारात्मक अश्या पध्दतीची जशी आजपर्यंत वागणूक दिली गेली आहे, संप्रदयाचा वसा वारसा पुढे घेऊन जात असताना व्यवाहारिक  शिक्षण मोठ्या प्रमाणात दिल गेल.व्यवहार व अध्यात्म या दोघांचा जोड हे विद्यालय जोपासत आलंय ते जोपासत राहील.

महाराज मंडळी साक्ष आहे अश्या प्रकारची घटना आजपर्यंत घडली नाही.दोन दिवसात अगदी कशी घडली. त्यावर आमची सकारात्मक चर्चा झाली.त्या वाहिनीच्या माध्यमातून वारकरी संप्रदायिकांना,महाराज मंडळी ,विद्यार्थ्यांना भंडारे यांनी विनंती केली आहे.ज्ञानेश्वर विद्यालय आपलं आहे ,आपलं आहे म्हणून विषय येथे संपला आहे.

यासंदर्भात दि.15 रोजी काल साडे सात वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती.परंतु काही कारणास्तव ती बैठक होऊ शकली नाही.परंतु संबंधित विषयावर व्हाट्स अप ग्रुपवर  ग्रामस्थांची चांगलीच चर्चा रंगली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.