Bhosri : उसन्या पैशांसाठी तगादा लावला म्हणून तरुणाची आत्महत्या, दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – उसन्या पैशांसाठी तगादा लावला म्हणून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. यावरून पैशांची मागणी कऱणाऱ्या दोघांवर  भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी (दि.14) सकाळी चक्रपाणी वसाहत, भोसरी (Bhosri) य़ेथे घडला आहे.

Alandi : आळंदीतील शाळेत एका शिक्षकाने वारकरी विद्यार्थ्यांच्या गळ्यातील माळा तोडल्याचा प्रकार :वारकरी संप्रदायाने केले माफ

सागर अप्पाराव वाघमारे (वय 26 रा.भोसरी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी  शिवम बनवारी दास (रा. वडगाव शेरी, पुणे) व सतिष ननावरे (रा.भोसरी) यांच्यावर आत्महत्यासे प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर सोमवारी अमर आप्पा भुसारे (वय 23 रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ सागर याने आरोपींकडून उसने पैसे घेतले होते. मात्र ते त्याने परत केले नाहीत. यासाठी आरोपींनी सागर याच्याकडे पैशांचा तगादा लावत त्याला मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून सागर याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. यावरून भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.