मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर धावत्या ट्रकला लागली आग

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर (Mumbai Pune Expressway) आडोशी बोगदा याठिकाणी पुण्याच्या दिशेने जाणार्‍या एका ट्रकला अचानक शाॅर्ट सर्किट होऊन आग लागल्याने ट्रक जळून खाक झाला.

किलोमिटर 41.00 च्या दरम्यान रात्री 2.30 वाजता ही घटना घडली. मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेला ट्रक RJ 27 GD 4866 याला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गाडीला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकाने गाडी बाजुला घेतली. तर हे समजताच आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि खोपली नगरपालिकेची फायर ब्रिगेड यंत्रणा घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवली.

PM Birthday : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमीत्त तळेगाव दाभाडे येथे भरणार एका बुद्धिजीवी संमेलन

चालक आणि त्याचा सहकारी दोघांनाही सुखरूप बाहेर (Mumbai Pune Expressway) काढण्यात यश आले. या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पुणेकडे जाणारी वाहतूक 2.40 ते 3.10 बंद करण्यात आली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.