Alandi : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणास अटक

एमपीसी न्यूज – एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक (Alandi) अत्याचार केला. त्यामध्ये मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली. हा प्रकार 20 जानेवारी ते 14 मे या कालावधीत आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला.

अक्षय बाळू दिघे (वय 20, रा. पोखरणी वस्ती, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची (Alandi)मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना आरोपीने मुलीला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

त्यामध्ये मुलगी दोन महिन्यांची गरोदर राहिली असता हा प्रकार उघडकीस आला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Pune : पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी आत्महत्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.