Aasaram bapu News : बलात्कारप्रकरणी आसाराम बापूंना काय होणार शिक्षा ?

एमपीसी न्यूज- 2013 मध्ये दाखल झालेल्या महिला शिष्य वरील बलात्कार प्रकरणात गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने आध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला दोषी ठरवले आहे. या प्रकरणात आज (मंगळवारी) सुनावणी होणार (Aasaram bapu News) आहे. सत्र न्यायाधीश डी के सोनी यांनी या प्रकरणातील निर्णय राखून ठेवला आहे. याच गुन्ह्यातील सह आरोपी असलेल्या आसारामच्या पत्नीसह सहा जणांची न्यायालयाने पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
सन 2001 ते 2006 या काळात आसाराम बापू ने आश्रमातील एका शिष्य महिलेवर अनेक वेळा बलात्कार केल्याचा आरोप त्यावेळी करण्यात आला होता. याप्रकरणी चंद्खेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुजरात मधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. न्यायालयाने आसारामला भारतीय दंड संहितेच्या कलम 376 2 (सी), (बलात्कार), 377 (अनैसर्गिक गुन्हे) आणि इतर तरतुदीनुसार दोषी ठरवले आहे.

दरम्यान सुरतमधील एका महिलेने केलेल्या तक्रारीनंतर आसाराम बापू आणि इतर सात जणांविरुद्ध बलात्कार आणि बेकायदा प्रकरण दाबून ठेवल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा खटला सुरू असताना ऑक्टोबर 2013 मध्ये यातील एकाचा मृत्यू झाला. 2014 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात (Aasaram bapu News) आले होते. दरम्यान आणखी एका बलात्कार प्रकरणात आसाराम बापूला शिक्षा सुनावण्यात आली असून तो सध्या जोधपूर येथील तुरुंगात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.