Sangvi : पिंपळे गुरव मधून सव्वा लाखांचा गुटखा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव मधून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1 लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) रात्री केली.

छोगाराम पेमाराम चौधरी (वय 34, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस सांगवी परिसरात गस्त घालत असताना अशोक नगर पोस्ट ऑफिसच्या मागे एक इसम संशयितरित्या आढळला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो गुटखा विकत असल्याचे सांगितले. यावरून त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली करत त्याच्या गोडाऊन मधून विमल, आर.आम.डी. गोवा असा तब्बल 1 लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. अन्न व प्रशासन विभागाच्या अधिका- यांना बोलावून पुढील कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस हवालदार प्रदिप शेलार, राजन महाडिक, एस जी मगर, दिनकर भुजबळ, बाळासाहेब सुर्यवंशी,रमेश भिसे, टि.डी. घुगे, राजेंद्र बांबळे, प्रसाद जंगलीवाड, संतोष दिघे, प्रदिप गुट्टे, पांडुरंग फुंदे, अशोक गारगोट यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.