Pune : दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – वर्षभरापूर्वी स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गजाआड करण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे. फरारी यादीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वारगेट पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना , दरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रवी वैरागर याला ताब्यात घेण्यात आले .
_MPC_DIR_MPU_II
अधिक चौकशी केल्यानंतर 2017 मध्ये त्याने त्याच्या साथीदारांसह गुलटेकडी परिसरात तलवार आणि हॉकी स्टिक घेऊन घरात घेऊन घुसून मारहाण करून पैसे आणि दागिने लुटून नेले असल्याचे कबूल केले . त्यानंतर तो फरार झाला होता.
ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा 1चे समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक पोलीस फौजदार बाबा चव्हाण, अनिल घाडगे, विनायक पवार यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.