Pimpri: प्लास्टिक वापरणा-या दुकानदारांवर पालिकेचा कारवाई बडगा; 65 हजार रुपये दंड वसूल 

एमपीसी न्यूज – गणेशोत्सवाच्या चार दिवसात प्लास्टिक आणि थर्माकोल वापरणा-या 13 दुकानदारांकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, 27 किलो प्लास्टिक व सहा किलो थर्मोकॉल जप्त करण्यात आले आहे. 

गणेश उत्सावादरम्यान महापालिकेने प्लास्टिक आणि थर्माकॉल बंदीवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. प्रभागनिहाय कारवाई सुरु आहे. मंगळवार (दि.11) ते शुक्रवार (दि.14) या चार दिवसात 368 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 13 दुकानांवर कारवाई करत त्यांच्याकडून 65 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील पाच दुकानांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून 25 हजार रुपये दंड वसूल केला. तर, सहा किलो प्लास्टिक आणि तीन किलो थर्माकॉल जप्त करण्यात आले. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एका दुकानावर कारवाई करत पाच हजार रुपये दंड वसूल केला असून चार किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत 162 दुकानांची तपासणी करण्यात आली.

‘ड’,  ‘इ’ आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील प्रत्येकी एका दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार असा 15 हजार रुपये दंड वसूल केला असून बारा किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दोन दुकानांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड आणि एक किलो थर्माकॉल जप्त करण्यात आले आहे. ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दोन दुकानांवर कारवाई करत त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड आणि एक किलो थर्माकॉल जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like