Pune news : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने 88 आस्थापनांवर कारवाई

एमपीसी न्यूज – उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने दिवाळीनिमित्त 17 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित तपासणी मोहिमेत वजने (Pune news) व मापांचे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन न केलेल्या तसेच आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन केलेल्या एकूण 88 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. 

वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 तसेच त्या अंतर्गत महाराष्ट्र वैध मापन शास्त्र (अंमजबजावणी) नियम, 2011 व वैधमापन शास्त्र ( आवेष्टित वस्तु) नियम, 2011 मधील नियमांचा भंग केल्यामुळे या आस्थापनांवर कारवाई करुन खटले दाखल करण्यात आले.

Drama competition : 61 वी हौशी मराठी नाट्य स्पर्धा 15 नोव्हेंबर पासून पिंपरी-चिंचवड केंद्रावर होणार

ग्राहकांची फसवणूक होऊ नये याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक 022-22622022, 020-26137114, (Pune news) तसेच 9869691666 या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेल पत्त्यावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा वैध मापन शास्त्र उप नियंत्रक संजीव कवरे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.