PCMC News : पशुवैद्यकीय दवाखाने व प्राणिसंग्रहालयासाठी, पशुशल्यचिकित्सकांसह 16 जणांची मानधनावर नियुक्ती

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विभागाअंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाने व प्राणिसंग्रहालयासाठी सहा महिन्यांच्या कालावधीकरिता पशुशल्यचिकित्सक, (PCMC News) पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह 16 जणांची मानधनावर नेमणूक केली आहे. त्यांच्या मानधनावर दरमहा साडेपाच लाख रुपये खर्च होणार आहे.

पिंपरी -चिंचवड महापालिका पशुवैद्यकीय विभागांतर्गत पशुरुग्णालय, प्राणी शुश्रूषा केंद्र आणि प्राणिसंग्रहालयाचे कामकाज पाहिले जाते. पशुवैद्यकीय विभागाअंतर्गत आजारी किंवा जखमी प्राण्यांवर आवश्यकतेनुसार उपचार केले जातात. यासाठी आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ प्राप्त करणे आवश्यक आहे. मानधनावर पशुशल्यचिकित्सक, पशुवैद्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्युरेटर, या दरमहा पदाचे उमेदवार उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करून राबविण्यात येते.

Pune news : उप नियंत्रक वैध मापन शास्त्र कार्यालयाच्यावतीने 88 आस्थापनांवर कारवाई

सहा महिने कालावधीसाठी हंगामी स्वरूपात या अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, मानधन कमी असल्याने या पदासाठी उमेदवार उपलब्ध होत नाहीत.(PCMC News) जे उपलब्ध होतात ते राजीनामा देवून सोडून जातात. ही बाब लक्षात घेवून उमेदवारांकडून सलग सेवा घेण्यासाठी त्यांच्या सद्य:स्थितीतील मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पशुशल्यचिकित्सक पदासाठी दरमहा 65 हजार रुपये तसेच पशुवैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यक, क्युरेटर किंवा अभिरक्षक या पदासाठी दरमहा 60 हजार रुपये,लाईव्ह स्टॉक सुपरवाझर पदासाठी 24 हजार, डॉग पिग स्कॉड कुली या पदासाठी 21 हजार 616 रुपये असे मानधन निश्चित करण्यात आले.

त्यानुसार महापालिकेच्या पशुवैद्यकीय दवाखाने आणि प्राणी शुश्रूषा केंद्र येथे एक पशुशल्यचिकित्सक, चार पशुवैद्यकीय अधिकारी, चार लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, एक ॲनिमल किपर, सहा डॉग पिग स्कॉड कुली असे 16 अधिकारी, कर्मचारी घेण्यात येणार आहेत. (PCMC News) या अधिकारी-कर्मचाऱ्यांची सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी दरमहा 5  लाख 54 हजार रुपये एवढा खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.