Jitendra Awhad : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी केले अटक

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मॉलमधील मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी आटक केली आहे. (Jitendra Awhad) वर्तकनगर पोलीस ठाण्यात आव्हाड यांची चौकशी होणार आहे.

याप्रकरणी आव्हाड यांच्यासह त्यांच्या सुमारे शंभर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांना आज (ता.11 नोव्हेंबर) वर्तकनगर पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले यावेळी त्यांना अटक करण्यात आली असल्याचे खुद्द आव्हाडांनीच माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.

PCMC News : पशुवैद्यकीय दवाखाने व प्राणिसंग्रहालयासाठी, पशुशल्यचिकित्सकांसह 16 जणांची मानधनावर नियुक्ती

आपण चांगल्या कामासाठी आंदोलन केले आहे. यामुळे मी या प्रकरणी जामीन मागणार नाही. सरकार पोलिसांवर दबाव टाकत असून सत्तेचा दुरूपयोग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

तसेच, आधी माझ्यावर लावलेले कलमांवरून मला अटक होऊ शकत नव्हती. मात्र, आता कलम वाढवण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Jitendra Awhad) अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या अटकेचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.

 

हर हर महादेव चित्रपटाचा वाद भोवला

हा सर्व वाद हरहर महादेव चित्रपटापासून सुरू झाला आहे. या चित्रपटात चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यानंतर विवियाना मॉलमध्ये राडा झाला.(Jitendra Awhad) याच मॉलमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी आता आव्हाड यांना अटक केली आहे. हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे, मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल, पण मी गुन्हा कबूल करणार नसल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.