Rahatani : न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचलित ‘न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल’ रहाटणी (Rahatani) येथे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 11  नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात आला.

Jitendra Awhad : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना पोलिसांनी केले अटक

या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार हे प्रमुख पाहुणे म्हणून (Rahatani) उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व गुलाब पुष्प देऊन सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अरुण चाबुकस्वार सरांनी मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवादेवी तिवारी, प्रणिता जाधव, देवयानी काटे या विद्यार्थिनींनी भाषण केले. कार्यक्रमांसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी वैष्णवी गवळी हिने केले व स्वराली शिंदे या विद्यार्थिनीने आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.