Akurdi : आकुर्डीतील संत तुकाराम महाराज पालखी तळ सुशोभीकरणासहीत प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी

एमपीसी न्यूज आकुर्डीतील संत तुकाराम महाराज पालखी तळ आणि प्रभागातील (Akurdi) इतर रस्त्यांचेही नूतनीकरण व सुशोभीकरण करावे तसेच आकुर्डीतील उर्दू माध्यमिक शाळेतील विज्ञान शाखेच्या इमारतीचे नव्याने नुतनीकरण करण्याची मागणी दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने तौहिद जावेद शेख आणि इखलास सय्यद यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

दिवंगत नगरसेवक जावेद शेख स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने अजितदादांना दिलेल्या (Akurdi) निवेदनात असे म्हणले आहे की, “आकुर्डी प्रभाग क्र.14 या प्रभागामध्ये काही विकासकामांचा अंदाजपत्रकात समावेश असूनही मागील 3 वर्षात विकासकामे झालेली नाहीत. विशेषत: संत तुकाराम महाराज पालखीतळाचे सुशोभिकरण, संत तुकाराम महाराज पालखीतळ ते आकुर्डी- खंडोबा चौक या पालखी मार्गाचे सुशोभिकरण, लोकमान्य हॉस्पिटल ते म्हाळसाकांत महाविद्यालय चौक या पालखीतळाला समांतर असलेल्या रस्त्याचे सुशोभिकरण आणि महापालिकेच्या आकुर्डी येथील उर्दू माध्यमिक शाळेतील विज्ञान शाखेच्या इमारतीचे नव्याने नुतनीकरण करणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत आहेत.

Talegaon : पोलीस असल्याची बतावणी करून महिलेचे दागिने पळवले

विकास कामांसाठी दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांनी 2022 मध्ये पत्र देऊन सन 2022 21 च्या अंदाजपत्रकात समाविष्ट करण्याचे कळविले होते. त्या अनुषंगाने महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या कार्यालयातीलच्या सभावृतांत हे विषय मंजुर करण्यात आले, तरीही अद्याप त्या कामांची पुर्तता झाली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

वारंवार जनसंवाद सभेत हे प्रश्न उपस्थित केल्यानंतरही पुरेशी तरतूद उपलब्ध झाल्यानंतर विकासकामे सुरू करण्यात येतील अशा आशयाचे पत्र आम्हाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आकुर्डी भागात दरवर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असतो, राज्यातील लाखो वारकरी व भाविक भक्त आकुर्डीतील याठिकाणी भक्तीभावाने येत असतात.

ही पालखी लोकमान्य टिळक चौक ते आकुर्डी विठ्ठल मंदिर व पुढे खंडोबा मंदिर चौक मार्गे पुण्याच्या दिशेने रवाना होते, हा सोहळा वारकरी व विठ्ठलभक्तांच्या जिव्हाळ्याचा असून वारकरी, दिंडीकरी, भक्तांना मूलभूत सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य असून केवळ दुर्लक्षपणामुळे हा विकास खुंटला आहे असेही त्यांनी निवेदनात नमूद केले.

त्याच बरोबर आकुर्डी उर्दू माध्यमिक शाळेतील विज्ञान शाखेच्या इमारतीचे नुतनीकरण हा विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या व पालकांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. असे असूनही निधी अभावी विकास थांबला आहे.या प्रश्नाकडे लक्ष देउन तातडीने सोडवून सर्व कामे मार्गी लावावीत” असे त्यात नमुद केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.