Akurdi : देशी दारुची वाहतूक केल्या प्रकरणी एकाला मुद्देमालासह अटक

एमपीसी न्यूज – आपल्या दुचाकीवरून (Akurdi) बेकायदेशीररित्या देशी व विदेशी दारुची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी (दि.30) आकुर्डी येथे केली आहे.
करुणाकर हेरीअप्पा शेट्टी (वय 45 रा. चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव असून पोलीस शिपाई मितेश मोहन यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Dhanore : चौघांनी केली घरफोडी, साडे चार लाखांचा ऐवज लंपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच 14 एच झेड 3509) वरून दारूची बेकायदेशीररीत्या दारुची वाहतूक करत होता. पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून 11 हजार 785 रुपयांची दारु व 50 हजार दुचाकी असा एकूण 61 हजार 785 रुपयांचा ऐवज जप्त केला. याचा पुढील तपास निगडी पोलीस (Akurdi) करत आहेत.