Alandi : आळंदीत पावसाची जोरदार हजेरी

एमपीसी न्यूज : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आज आळंदीत (Alandi) सायंकाळी सहा वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी अचानकपणे जोराचा पाऊस सुरू झाल्याने लोकांची तारांबळ उडाली. कामानिमित्त पायी बाहेर पडलेले व काही दुचाकी वाहन चालवणारे नागरिक पावसात भिजले. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते.

Rahuri Crime : ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी मामा टोळी जेरबंद; 11 गुन्हे उघडकीस

आळंदीतील बहुतेक ठिकाणच्या शेतातल्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. शेतातील पिके उगवताना (Alandi) दिसत आहेत. मागील संततधार, मुसळधार पावसाने यंदा काही ठिकाणी ओढ्याला लवकरच पाणी आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओढ्यालगत असणाऱ्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. आज झालेल्या पावसाने त्यात अजून भर पडणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.