Pune Youth Congress: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ED चौकशी विरोधात पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक

एमपीसी न्यूज:  पुण्यात युवक काँग्रेसच्यावतीने (Pune Youth Congress) आज रेल रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची सध्या ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्याविरोधात युवक काँग्रेस राज्यभर आक्रमक झाली आहे. राज्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पुण्यातही युवक काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात युवक कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. पुणे-लोणावळा लोकलसमोर, लोकल अडवून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भर पावसात घोषणा दिल्या.

 

पुण्यात सध्या पाऊस सुरू आहे. अशाच भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेसने खडकी रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन केलं. यावेळी पुणे लोणावळा लोकल अडवून धरण्यात आली. युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल शिरसाट यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पुण्यासह मुंबई, दिल्लीतही संसद भवन परिसरात काँग्रेसच्या खासदारांचे आंदोलन सुरू आहे. (Pune Youth Congress) सोनिया गांधी यांच्या मागे ईडीची चौकशी लागल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.