Alandi : आळंदीमध्ये झेंडूच्या फुलांनी बाजारपेठा फुलल्या ; झेंडूच्या भावात यंदा घट

एमपीसी न्यूज – आज ( दि.23 रोजी) आळंदी शहरात सकाळ पासूनच झेंडूच्या (Alandi) फुलांनी लक्ष्मी माता चौक,हजेरी मारुती चौक ,  श्री भैरवनाथ चौक , वडगांव रस्ता व शहरातील विविध ठिकाणचे भाग फुलून गेला होता. दसऱ्या निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले विक्रीला आली असून सायंकाळी 4 वाजेपर्यंत किरकोळ विक्री किमान दर 40 रु.कि. ते कमाल 50 रु.कि.पर्यंत दिसून येत होता.

Chakan : चाकण-पुणे मार्गावर वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

झेंडूचा दर हा त्याच्या प्रति(दर्जा) वरून कमी जास्त प्रमाणात दिसून येत होता. दसऱ्या निमित्त नागरिक झेंडूची फुले मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येत होते. गेल्या वर्षीपेक्षा झेंडूच्या फुलांची आवक यंदा शहरात जास्त प्रमाणात दिसून आली.

गेल्या वर्षी( 2022) दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा दर शहरात सकाळी 60 रु. राहिला होता तर संध्याकाळी  80 रु.पर्यंत पोहचला (Alandi) होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.