Chinchwad : कॅब, रिक्षा चालक, फूड डिलिव्हरी बॉयचा बुधवारी संप

एमपीसी न्यूज – आपल्या विविध मागण्यांसाठी (Chinchwad) कॅब चालक, रिक्षा चालक आणि फूड डिलिव्हरी बॉय यांनी इंडियन गिग वर्कर्स फ्रंट या संघटनेच्या माध्यमातून बुधवारी (दि. 25) एक दिवसाचा संप पुकारला आहे. एक दिवस संपावर जाऊन आपल्या मागण्या निदर्शनास आणून देण्यासाठी या कॅब, रिक्षा चालक आणि डिलिव्हरी बॉयकडून हे आंदोलन केले जाणार आहे.

महाराष्ट्र गिग वर्कर्स ऍक्ट व महाराष्ट्र कॅब ऍग्रीगेटर नियम राज्यात लागू करावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. या कायद्यात कॅब, रिक्षा चालक आणि डिलिव्हरी बॉय यांचा विमा, कल्याणकारी मंडळ, निवृत्ती वेतन, मुलांसाठी शिष्यवृत्ती अशा अनेक सुविधांचा उल्लेख आहे. त्यामुळे हा कायदा लागू केल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील असे इंडियन गिग वर्कर्स फ्रंटकडून सांगण्यात आले.

कॅब चालकांच्या मागण्या

  • रिक्षा टॅक्सी मीटर प्रमाणे कॅबचे मूळ दर निश्चित करावेत. त्यासाठी खटुआ समितीची शिफारस स्वीकारावी.
  • एव्हरेस्ट फ्लीट सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सामान्य कॅब चालकांचा व्यवसाय कमी होतो. त्यामुळे या कंपन्यांवर नियंत्रण आणावे.
  • प्रायव्हेट व्हेंडर्स नेमून त्यांच्या माध्यमातून सामान्य कॅब चालकांच्या आऊट स्टेशन ट्रिप चोरू नये.
  • ट्रिप दरम्यान चालकाला काही अडचण आल्यास त्यासाठी इफेक्टिव्ह ऑनलाईन किंवा ऑफलाईन यंत्रणा असावी. (Chinchwad)
  • कोणत्याही चालकाचे आयडी ब्लॉक करताना प्रवाशाने केलेल्या तक्रारीची खातरजमा करावी.
  • पिकअप चार्जेस, बेटिंग चार्जेस, पॅसेंजर कॅन्सलेशन चार्जेस, नाईट चार्जेस पूर्वीप्रमाणे व्हावेत.

रिक्षा चालकांच्या प्रमुख मागण्या

  • प्लॅटफॉर्म फी त्वरित बंद करावी. मीटर प्रमाणे वेटिंगचे पैसे द्यावे.
  • दिवसभर थांबून देखील भाडे मिळत नाही. अॅपवर रिक्षापेक्षा कॅब स्वस्त केल्याने रिक्षाला भाडे मिळत नाही. यावर तोडगा काढावा.

Chakan : चाकण-पुणे मार्गावर वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

फूड पार्सल डिलिव्हरी बॉयच्या मागण्या

  • ऑर्डरचे दर सर्वांना सामान करावे. त्यात कमीत कमी 50 टक्के वाढ करावी.
  • डिलिव्हरी बॉयला काही अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी यंत्रणा असावी. (Chinchwad)
  • टीम लीडरने नियमित भेट देऊन डिलिव्हरी बॉयचे प्रश्न मार्गी लावावेत.
  • फोनवर दिसणारे अंतर व प्रत्यक्षातील अंतर यात फरक नसावा. डिलिव्हरी बॉयला इन्सेन्टिव्ह मिळू नये म्हणून शेवटच्या ऑर्डरमध्ये गोलमाल केला जातो. तसे करू नये.
  • डिलिव्हरी बॉयवर आयडी ब्लॉक करणे, दंड लावणे अशी कारवाई करण्यापूर्वी ग्राहकाने केलेल्या तक्रारीची शहानिशा करावी.
  • आयडी ब्लॉक करण्यासाठी नेमलेले दलाल शोधून त्यांच्यावर कारवाई करावी.
  • प्रतिदिन किमान कमाई मिळण्याची सोय असावी.

पोर्टर आणि अर्बन कंपनी सारख्या अॅपवर काम करणाऱ्या कामगारांचे देखील अशा प्रकारचे प्रश्न आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.