Chikhali : दांडिया खेळताना दांडिया लागल्याने अल्पवयीन मुलास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – दांडिया खेळताना चुकून दांडी लागल्याच्या (Chikhali)  कारणावरून तीन जणांनी मिळून एका अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 21) सायंकाळी पावणे सात वाजता ओंकारनगर चौक, जाधववाडी, चिखली येथे घडली.

 

Chinchwad : कॅब, रिक्षा चालक, फूड डिलिव्हरी बॉयचा बुधवारी संप

आदित्य उर्फ डापक्या, विशाल पवळे, गणेश कोठावळे (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. ओंकारनगर, जाधववाडी, चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ओंकारनगर चौकात दांडिया खेळत असताना त्यांच्या तोंड ओळखीची मुले आरोपी यांना चुकून दांडीया लागली. त्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादी यांच्या तोंडावर, डोळ्यावर हाताने मारहाण केली.

आरोपी गणेश याने सिमेंटच्या ब्लॉकने फिर्यादीच्या डोक्यात, कानावर, गालावर मारून गंभीर जखमी केले. ‘जर तू आमच्या नादाला लागला तर तुला मारून टाकू’ अशी आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत (Chikhali) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.