Pune : पुण्यात रंगणार अकरावा तालचक्र महोत्सव

एमपीसी न्यूज – तालवाद्यांना केंद्रस्थानी ठेवून (Pune) आयोजित करण्यात येणारा आणि तालवाद्यांचा देशातील एक महत्त्वाचा संगीत महोत्सव म्हणून ओळख असलेला तालचक्र महोत्सव येत्या शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर ते रविवार 29 ऑक्टोबर दरम्यान संपन्न होणार असल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक आणि पद्मश्री पं विजय घाटे यांनी दिली आहे.

महोत्सवाचे हे 11 वे वर्ष असून तीन दिवसीय महोत्सवातील पहिल्या दिवसाचे कार्यक्रम मयूर कॉलनी येथील बालशिक्षण सभागृहात सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरू होतील. तर दुसऱ्या व तिसऱ्या दिवसाचे कार्यक्रम हे सायंकाळी 6 वाजल्यापासून स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे संपन्न होतील असेही असेही विजय घाटे यांनी सांगितले.

महोत्सवाचा पहिला दिवस केवळ तरुण, आश्वासक कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने राखीव ठेवण्यात आला असून महोत्सवाच्या दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध कलाकारांची कला अनुभविण्याची संधी रसिक पुणेकरांना उपलब्ध होईल, असे पं विजय घाटे यांनी सांगितले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात सायं 5 वाजता आश्वासक तबला वादक सागर पाटोकर आणि रोहित ठाकूर यांच्या (Pune) तबला सहवादनाने होणार आहे. त्यांना अभिषेक शिनकर हे संवादिनी साथ करतील. यानंतर सुरंजन खंडाळकर आणि शरयू दाते यांचा ‘सूर सुरंजन’ हा कार्यक्रम संपन्न होईल.

यावेळी अभिजित भदे (ड्रम्स), श्रुती भावे (व्हायोलिन), पांडुरंग पवार (तबला), रोहित कुलकर्णी (की बोर्ड) हे त्यांना साथसंगत करतील.

महोत्सवाचा दुसरा दिवस हा ‘तालदिंडी’ या विशेष कार्यक्रमाने सुरु होईल. यामध्ये पं विजय घाटे (तबला), पं डॉ राम देशपांडे (गायन), सुप्रसिद्ध कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर, गंधार देशपांडे (गायन), ओंकार दळवी (पखावज), अमर ओक (बासरी), अभिषेक शिनकर (संवादिनी) यांचे एकत्रित सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवसाचा समारोप हा नीलाद्री कुमार यांच्या सादरीकरणाने होईल.

Chinchwad : कॅब, रिक्षा चालक, फूड डिलिव्हरी बॉयचा बुधवारी संप

यावेळी नीलाद्री सुरबहार, सतार, झिटार यांचे सादरीकरण करतील. त्यांना पं विजय घाटे (तबला), श्रीधर पार्थसारथी (मृदंगम), अॅग्नेलो फर्नांडिस (की बोर्ड) आणि मुकुल डोंगरे ड्रम्स हे साथसंगत करतील.

महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात सेनिया बंगश घराण्याच्या 7 व्या पिढीचे कलाकार आणि सुप्रसिध्द सरोद वादक अमजद आली खान यांचे सुपुत्र व शिष्य अमान अली बंगश यांच्या बहारदार सरोद वादनाने होईल. त्यांना बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक व संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते पं कुमार बोस हे साथसंगत करतील.

महोत्सवाचा समारोप पं वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या गायनाने होईल. राहुल देशपांडे यावेळी फ्युजन 2023 हा कार्यक्रम सादर करतील. त्यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), अनय गाडगीळ (की बोर्ड), सारंग कुलकर्णी (सरोद) आणि ईशान घोष (तबला) हे साथसंगत करतील. निवेदक मिलिंद कुलकर्णी हे संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन करतील.

महोत्सवात 27 ऑक्टोबर रोजी बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी येथे सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणा-यास प्राधान्य या तत्त्वावर तो दिला जाईल. तर 28 व 29 ऑक्टोबर रोजी सादर होणाऱ्या कार्यक्रमांसाठी सशुल्क प्रवेश असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.