Maharashtra : महाराष्ट्रातून देशाचा पहिला अग्निवीर अक्षय गवते देशासाठी शहीद

एमपीसी न्यूज : मूळचे बुलढाण्याचे असलेले (Maharashtra) अक्षय गवते देशासाठी शहीद होणारे पहिले अग्निवीर ठरले आहेत. महाराष्ट्राचे सुपुत्र अक्षय गवते हे लडाखच्या सियाचिनमध्ये शहीद झाले. अग्निवीर असलेल्या अक्षय गवते लाईन ऑफ ड्युटीवर तैनात होते.

काराकोरम रेंजमध्ये 20 हजार फूट उंचीवर असलेलं सियाचीन जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी आहे. या ठिकाणी सैनिकांना भीषण थंडी आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा सामना करावा लागतो. शत्रू सैन्यापेक्षा इथलं वातावरण सैनिकांची परीक्षा घेतं.

Pune : पुण्यात रंगणार अकरावा तालचक्र महोत्सव

अक्षय गवते यांच्या निधनाबद्दल भारतीय लष्करानं शोक व्यक्त केला. सियाचीनमध्ये अक्षय गवते ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. (Maharashtra) भारतीय सैन्यातील अग्निवीर या नव्या भरती योजनेनुसार केवळ 4 वर्षाकरिता सैन्यामध्ये सेवा करता येते. त्यानंतर त्यांना निवृत्ती देण्यात येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.