Chikhali : रिव्हर मैदान हॉर्स रायडिंगसाठी भाडेतत्त्वावर दिल्याने स्थानिकांमध्ये संताप, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

एमपीसी न्यूज –  मोशी, चिखली येथील रिव्हर रेसिडन्सी मैदान (ग्राऊंड) महापालिकेने ( Chikhali ) हॉर्स रायडिंगसाठी खासगी संस्थेला भाड्याने दिले आहे. स्थानिक नागरिक, नेतृत्वाता कोणतीही कल्पना न देता, कोणतीही नोटीस न देता हे ग्राउंड स्थानिक लोकांपासून हिसकावून घेत  बलाढ्य लोकांसाठी हॉर्स रायडिंगकरिता भाडेतत्वावर देण्यात आले असून महापालिकेचा हा खासगी करणाचा घोटाळा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

मोशी परिसरातील सर्व सोसायटीच्या खेळाडूंना आपले आरोग्य सांभाळण्यासाठी व मुलांना खेळासाठी (Chikhali) प्रवर्त करण्यासाठी एकच मैदान शिल्लक होते. तेही प्रशासनाने स्थानिक लोकांना कोणतीही कल्पना न देता व कुठलीही नोटीस न देता हे ग्राउंड भाडेतत्त्वावर बलाढ्य लोकांसाठी हॉर्स रायडिंगसाठी देण्यात आलेले आहे.

आसपासचे सर्व सोसायटी ऐश्वर्या हमारा आर के एच रिव्हर रेसिडेन्सी, वास्तु ड्रीम, क्रिस्टल सिटी, स्वराज व इतर अनेक सोसायटी मधील जवळपास 500 ते 700 खेळाडू या ग्राउंडवर रोज खेळत असतात. वर्षातून अनेक महिने मोठे टूर्नामेंट भरवल्या जातात. अनेक करमणुकीचे मोठे खेळ या ग्राउंडवर खेळवले जातात. थोडा विसावा या ग्राउंडवर मिळत होता. तोही आज संपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला आहे.

Pune : पुण्यात रंगणार अकरावा तालचक्र महोत्सव

स्थानिक रहिवाशी मारुती तांबवाड म्हणाले, स्थानिक खेळाडूंसाठी मोकळे मैदान ( Chikhali ) एकच आहे. बाजूला कोणतेच मैदान नाही. आम्हाला खेळण्यासाठी मोकळे मैदान असावे. सामान्य माणसांची दखल न घेता प्रशासनाने भाडेतत्वावर मैदान दिले. हॉर्स रायडिंग हा उच्चवर्णीयांचा खेळ आहे.

संस्थेच्या नावाने हॉर्स रायडिंगसाठी कमी दरात दिले आहे. महापालिकेने आमच्या संस्थेला मैदान दिल्याचे संबंधितांकडून सांगितले जाते. विद्यार्थ्यांकडून 8 हजार रुपये शुल्क घेतले जाणार आहे. हे शुल्क न परवडणारे आहे.

आता रिव्हर रेसिडन्सी या परिसरात एकही मोकळे मैदान नाही. पूर्वी खेळण्यासाठी मैदान मोफत मिळत होते. खेळाडू, ज्येष्ठ नागरिक सायंकाळी या मैदानावर येत होते. आता नागरिकांना येण्यास मनाई केली जाईल. हे मैदान हॉर्सरायडिंगसाठी देऊ नये याकरिता  आयुक्तांकडे तक्रार केली आहे. सारथीवरही तक्रार केली.

पण, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही तक्रार केली आहे. हे मैदान सर्व खेळांसाठी ठेवावे. हॉर्सरायडिंगला विरोध नाही. पण, खासगीकरणाला, व्यावासायिक क्रीडा प्रकाराला आमचा विरोध आहे. सर्व खेळांसाठी मैदान खुले ( Chikhali ) ठेवावे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.