Chinchwad : नवदुर्गांचा सत्कार करत शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत नवरात्र उत्सव साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Chinchwad) परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील स्वयं रोजगार निर्मिती करणाऱ्या नवदुर्गांचा सोमवारी (दि.23) सत्कार करण्यात आला.

शाळेमध्ये यामध्ये निवेदिता कछवा, अमृता विप्र, मीनल शुक्ल, शुभांगी पिलनकर, अंकिता राऊत, प्राजक्ता चव्हाण, विनिता देशपांडे, स्मिता बोकील, स्वाती देशपांडे, वीणा बडगुजर, शितल घोडके यांचा समावेश होता. त्याचबरोबर मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थ्यांना आपल्या मातीशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली.

याच दिवशी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रावण दहन करण्यात आले विशेष म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी आपले अवगुण एका चिट्ठीवर लिहून आणले होते व त्याचे दहन करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांकडून डाळ, तांदूळ,साबण, तेल अश्या वस्तूंचे संकलन करण्यात आले व ते समाजातील गरजू विद्यार्थी व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत काम करणाऱ्या संस्था यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले.

Chikhali : रिव्हर मैदान हॉर्स रायडिंगसाठी भाडेतत्वार दिल्याने स्थानिकांमध्ये संताप, डीसीएमकडे तक्रार

याशिवाय नवरात्र उत्सव निमित्त शाळेमध्ये आई पालकांसाठी दांडीया व भोंडल्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. (Chinchwad) या कार्यक्रमाला आई पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सर्व कार्यक्रमांसाठी शाळेचे शाला समिती अध्यक्ष दामोदर भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम संपन्न केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.