Pune : अजस्त्र पॉवर ट्रान्सफॉर्मर..अडथळ्यांची शर्यत अन् महावितरणने केली ‘प्रकाशमान’ कामगिरी

एमपीसी न्यूज – पुणे परिमंडल अंतर्गत खेड शिवापूर (ता. हवेली) उपकेंद्रातील 22 टनी वजनाचा (Pune) अजस्त्र पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यानंतर अनेक अडथळ्यांना दूर सारून तो दोनदा बदलण्यात आला. या कालावधीत महावितरणच्या 48 अभियंते व कर्मचाऱ्यांनी ग्राहकसेवेसाठी तब्बल 70 तास अविश्रांत कर्तव्य बजावले. सोबतच 17 गावांतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देत प्रकाशमान कामगिरी केली.

याबाबत माहिती अशी की, मुळशी विभाग अंतर्गत खेड शिवापूर 33/22 उपकेंद्रातील 10 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर बुधवारी (दि. 18) रात्री 8.30 च्या सुमारास बंद पडला. त्यामुळे 17 गावांतील सुमारे 5500 ग्राहकांचा वीजपुरवठा रात्री 10 वाजता इतर पर्यायी यंत्रणेमधून सुरु करण्यात आला. गुरुवारी (दि. 19) सकाळी 8.30 वाजता तपासणीमध्ये हा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर 40 किलोमीटरवरील कोरगाव मूळ उपकेंद्रातील अतिरिक्त 10 एमव्हीएचा पॉवर ट्रान्सफॉर्मर (Pune) खेड शिवापूरला सायंकाळी नेण्यात आला. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर हा ट्रान्सफॉर्मर चार्ज करण्यात आला. परंतु, शुक्रवारी (दि. 20) सकाळी हा सुद्धा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. दरम्यान दिवसा भारव्यवस्थापन शक्य नसल्याने 15 उच्च व 40 लघुदाबाच्या ग्राहकांच्या वीजपुरवठ्यामध्ये दररोज 2 तासांचे चक्राकार भारनियमन करावे लागले.

Chinchwad : नवदुर्गांचा सत्कार करत शिक्षण प्रसारक मंडळीच्या शाळेत नवरात्र उत्सव साजरा

मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी चांडोली (ता. खेड) येथून दुसरा पॉवर ट्रान्सफॉर्मर तातडीने उपलब्ध करून दिला. शुक्रवारी रात्री 11.30 वाजता चांडोली येथून जडवाहतुकीच्या ट्रकमध्ये 22 टनी ट्रान्सफॉर्मरचा 60 किलोमीटरवरील खेड शिवापूरकडे प्रवास सुरु झाला. मात्र पहाटे 2 च्या सुमारास भोसरीनजिक एका स्पीडब्रेकरवरून हा ट्रान्सफॉर्मर चालकाच्या केबीनकडे सरकल्याने प्रवास थांबला.

शनिवारी (दि. 21) सकाळी 8.30 वाजता क्रेनने ट्रान्सफॉर्मर मागे सरकवल्यानंतर पुन्हा प्रवास सुरु झाला. रात्री 8 वाजता हा ट्रान्सफॉर्मर खेड शिवापूर उपकेंद्रात दाखल झाल्यानंतर तो कार्यान्वित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरु झाली. अखेर पहाटे 3.15 वाजता पॉवर ट्रान्सफॉर्मर यशस्वीपणे कार्यान्वित झाला.

सणासुदीच्या दिवसांत 70 तासांच्या अविश्रांत सेवेमध्ये दोनदा अजस्त्र 22 टनी पॉवर ट्रान्सफॉर्मर (Pune) बदलणे, त्याची चाचणी व जडवाहतूक, हेवी पॉवर क्रेनचा वापर, ऑईल बदलणे, पर्यायी वीजपुरवठा करण्यासाठी भारव्यवस्थापन व तांत्रिक उपाय करणे आदी कामे करण्यात आली. मुख्य अभियंता  राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अमित कुलकर्णी, धनजंय आहेर, संजय वाघमारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर,

अनिलकुमार चौधरी, अभिराज कोडिलकर, उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे, सचिन काळे, सहायक अभियंता निखिल कोंडूरवार, दिपाली कुलकर्णी, अभिजित भोसले, योगेश कराळे, हाजीमलंग बागवान, तुषार क्षीरसागर तसेच शिवापूर व वेळू शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली.  विशेष म्हणजे सहायक अभियंता (चाचणी) दीपाली कुलकर्णी यांनीही अविश्रांत कर्तव्य बजावले. महिलाशक्तीचे कौतुक म्हणून छोटेखानी कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते दीपाली व नितीन कुलकर्णी दाम्पत्याचा सत्कार करण्यात (Pune) आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.