Chakan : चाकण-पुणे मार्गावर वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू (Chakan)  झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक पळून गेला. ही घटना शनिवारी (दि. 21) रात्री साडेआठ वाजता चाकण-पुणे मार्गावर चिंबळी फाटा येथे घडली.

Pimpri : श्री संदीप वाघेरे युवा मंचच्या वतीने भव्य रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन

याप्रकरणी मयत महिलेच्या मुलीने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (Chakan)  अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई चिंबळी फाटा येथे रस्त्याने पायी चालत जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या.

अपघात झाल्यानंतर आरोपी वाहन चालकाने जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता तसेच पोलिसांना घटनेची माहिती न देता घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत (Chakan)  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.