Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गणित व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज  : मानवी जीवनातील वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासावृत्ती (Alandi), सृजनशीलता, कल्पकता अशा अनेक वृतींचा विकास होऊन यातून बालशास्त्रज्ञ निर्माण व्हावेत तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील गणित विषयाची भीती दूर होऊन गोडी निर्माण व्हावी व गणितातील प्रतिकृती मॉडेल यातून गणितीय संकल्पना सुलभ व्हाव्यात व त्याचा व्यावहारिक जीवनात उपयोग व्हावा यासाठी आळंदीतील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गणित व विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन संपन्न झाले.

यामध्ये विद्यार्थ्यांनी आत्ताच भारत देशाची मान व शान उंचावणाऱ्या चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रयोगाचे प्रकल्प चंद्रयान – 3, मानवी हृदयाची रक्ताभिसरण प्रक्रिया, नाविण्यपूर्ण वाहतूक स्पीड ब्रेकर, टाकाऊ रद्दी कागदापासून कागद निर्मिती अशा अनेक प्रकल्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

त्याचबरोबर कचऱ्यापासून वीज निर्मिती, व्याक्युम क्लिनर, ठिबक सिंचन, मोबाईल टॉवरमुळे पक्षांचा मृत्यू, नवीन कृषी कार्य मॉडेल, पवनचक्की, ज्वालामुखी, स्वच्छ भारत अभियान, सोलर पावर सिस्टम, विस्तार सूत्रे, पुठ्ठ्याची घड्याळ, पायथागोरस प्रमेय, चिन्हांची नावे, गणितीय फॉर्मुले असे शंभरहून अधिक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. स्वच्छता आणि आरोग्य अशा अनेक प्रकल्पातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.

याप्रसंगी आळंदी पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक विद्या माने त्यांच्या सहकारी (Alandi) वाकचौरे मॅडम समवेत संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, शिक्षकेतर प्रतिनिधी शिवाजी जाधव, विज्ञान प्रदर्शन प्रमुख शशिकला वाघमारे, गणित विभाग प्रमुख अनुजायिनी राजहंस, विज्ञान विभाग प्रमुख संजय उदमले, गणित व विज्ञान अध्यापक नारायण पिंगळे, संजय कंठाळे, अमीर शेख, अनुराधा खेसे, सायुज्यता तायडे, योगिता घोलप, संदीप वालकोळी, मनीषा पवार, लीना नेमाडे, अशोक होवाळ, बाळासाहेब भोसले, अरविंद शिंदे, गोविंद निळे, राजेंद्र सोनवणे, सावळाराम देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी अजित वडगावकर यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अनेक सुप्त गुणांना वाव मिळतो व यातूनच वैज्ञानिक व गणित तज्ञ तयार होऊन स्वतःचे व शाळेचे नाव उंचवावे यासाठी शुभेच्छा दिल्या. व शेवटी विद्या माने यांनी माऊलींच्या कृपाशीर्वादाच्या फलितामुळे आज या पोलीस उपनिरीक्षक पदावर असल्याने प्रथम माऊली प्रति भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त केली.

शालेय प्रदर्शनीच्या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात आल्याने स्वतःचे शालेय जीवन आठवले याविषयीचा आनंद व अनुभव व्यक्त केला. माऊलींच्या पसायदानातील अनेक दाखले देत अध्यात्म व विज्ञान तसेच शास्त्र यांचा निकटचा संबंध व्यक्त केला.

Thegaon : रखवालदार मदतनीस पदांच्या नोकरीसाठी बनवली खोटी कागदपत्रे,पाच जणांवर गुन्हा दाखल

आपल्याला सभोवताल व वातावरणातून खूप काही शिकण्यासारखे आहे त्याचा अभ्यास करून आपण आपल्या जीवनात पुढे जावे तसेच विद्यार्थी जेव्हा स्वतःचा विकास करतील तेव्हाच ते आपल्या जीवनात यशस्वी वाटचाल करून मोठे होतील, आणि मोठे होण्यासाठी मोठे स्वप्न पहा व त्या दृष्टीने वाटचाल करा असा संदेश दिला.

त्याचबरोबर मातृभाषेमुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला वाव मिळतो म्हणून मातृभाषेचे जतन व विकास करावा यासाठी आवाहन केले. संजय उदमले यांनी प्रास्ताविक शब्दबद्ध केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा खेसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शशिकला वाघमारे यांनी व्यक्त केले. परीक्षक म्हणून अनिता गावडे, संजय उदमले, नारायण पिंगळे, अमीर शेख यांनी काम केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.