Khed : ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपहार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शेतकऱ्याकडून ट्रॅक्टर ट्रॉली भाड्याने नेऊन त्या परत न (Khed) देता त्याचा अपहार करून शेतकऱ्याची फसवणूक केली. ही घटना मे 2022 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत खेड तालुक्यातील राक्षेवाडी चाकण येथे घडली.

ज्ञानेश्वर उर्फ माऊली मनोहर लोखंडे (रा. जालना), विठ्ठल मनोहर लोखंडे (रा. जालना), मनोहर लोखंडे (रा. जालना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजी वसंत राक्षे (वय 48, रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : टेम्पोला धडकून मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा (Khed) विश्वास संपादन करून दोन लाख रुपये किमतीच्या दोन ट्रॅक्टर ट्रॉली कामासाठी भाड्याने नेल्या. त्या परत न करता त्याचा अपहार करून फिर्यादी यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.