Pune : टेम्पोला धडकून मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मद्यपान करून दुचाकी चालवत जात असताना (Pune) दुचाकीची एका टेम्पोला पाठीमागून धडक बसली. यामध्ये मद्यपी दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास वल्लभनगर येथे जुना पुणे मुंबई महामार्गावर घडली.

सुरज राजेंद्र भंडारी (वय 22, रा. गेवराई, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी तन्मय विष्णू शेलार (वय 21, रा. कोंढवा. मूळ रा. गेवराई, जि. बीड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Toll Plaza News : टोल नाक्यांवर ‘हे’ असायलाच हवं; राज ठाकरे यांची स्पष्ट भूमिका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज भंडारी (Pune) हा मद्यपान करून दुचाकी (एमएच 16/सीडब्ल्यू 8144) चालवत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जात होता. वल्लभनगर येथील शेल पेट्रोल पंपाजवळ सुरज याने एका टेम्पोला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये सुरज हा गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.