Bhosari : पीएमपीएमएल बसच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएल बसने एका पादचारी तरुणाला धडक (Bhosari)दिली. त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 10) दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडली.

अंगद अच्छेलाल तुरहा (वय 26, रा. भगवानपूर, गोपालगंज, बिहार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजेश रामपुत तुरहा (वय 38, रा. वाघोली, पुणे. मूळ रा. भगवानपूर, गोपालगंज, बिहार) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार केशव पांडुरंग सावंत (रा. रहाटणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Khed : ट्रॅक्टर ट्रॉलीचा अपहार प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी केशव सावंत हा (Bhosari) पीएमपीएमएलमध्ये बस चालक आहे. त्याने त्याच्या ताब्यातील बस (एम एच 14/एच यु 6539) हयगयीने चालवली. पुणे-नाशिक महामार्गावर भोसरी येथे फिर्यादी यांचा पुतण्या रस्त्याने पायी चालत असताना आरोपी सावंत याने त्याच्या ताब्यातील पीएमपी बसने धडक दिली.

त्यात गंभीर जखमी झालेल्या अंगद याचा मृत्यू झाला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.