Alandi : पीएमटी बस स्टॉप जवळील जुने शौचालय पाडून नवीन शौचालयाची उभारणी करण्याची महिला आघाडीची मागणी

एमपीसी न्यूज : आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आळंदी महिला आघाडीच्या (Alandi) वतीने आळंदी पी एम टी बस स्टॉप जवळील जुने शौचालय पाडून नवीन शौचालयाची उभारणी करण्याबाबत व तसेच भक्त पुंडलिक मंदिरापासून ते जुन्या पुलापर्यंत असलेल्या अस्वच्छतेचा बंदोबस्त करण्याचे मागणी करणारे निवेदन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना देण्यात आले.

पीएमटी बस स्टॉप जवळील शौचालयाची व्यवस्था गलिच्छ असून ते अनेक महिने बंद अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिक स्मशानभूमीत लघुशंकेला जातात. ही बाब गंभीर आहे. असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Khed : पत्रकार संरक्षण कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी; हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाची मागणी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीने निवेदन देण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Alandi) पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना देण्यात आली.

यावेळी अनिता झुझम, शुभांगी यादव, योगिता धुमाळ, मीरा कांबळे, विद्या आढाऊ, संतोषी पांडे, जयश्री केंद्रे, संगीता मेटे, कल्याणी मालप, भारती वाघमारे, उषा नेटके, अनिता शिंदे, शैला तापकीर,अनुसया संगेवार इ.उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.