Alandi : स्वामी गोविंददेव गिरिजी यांचा महाराष्ट्राला अभिमान – भास्करगिरि महाराज

एमपीसी न्यूज – आज प्रत्येक तरुणाला मंत्री, साहेब व्हावंस (Alandi) वाटते. पण, वैदीक परंपरेचे ज्ञान आणि संतत्व ही फार भाग्याची गोष्ट असते. ही परंपरा टिकवणं हिच भारतमातेची सेवा आहे. आपल्या रुढी वपरंपरा जोपासतांना आपण मागे रहाता कामा नये आणि आकाशाला हात लावतानाही कमी पडता कामा नये.

हा सगळा विचार स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांनी केला आहे. कधी किशोर असलेले स्वामीजी आज गोविंददेव गिरिजी म्हणजे शिखराएवढे उंच झाले आहेत. आपल्या कर्मातून त्यांनी त्देवत्त्व प्राप्त केले असून महाराष्ट्राला स्वामी गोविंददेव गिरिजी यांचा अभिमान असल्याचे भावोद्गार श्रीदत्त देवस्थानचे प्रमुख ह.भ.प.भास्करगिरि महाराज यांनी व्यक्त केले.

Chinchwad : दारूचे पैसे मागितल्याने दुकानदारावर कोयत्याने हल्ला

राष्ट्रसंत, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र (Alandi) न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘गीताभक्ति अमृत महोत्सव’ कार्यक्रमात कीर्तनसेवा देतांना ते बोलत होते. यावेळी स्वामी गोविंददेव गिरिजी यांच्यासह अनेक संत व मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या कीर्तनात भास्करगिरिजी यांनी गोविंददेव गिरिजींच्या जीवनावर प्रकाश टाकताना पुणे व अहमदनगर जिल्ह्याला त्यांचा विशेष अभिमान असल्याचा उल्लेख केला. देशातील सर्व संत-महंत त्यांच्या संपर्कात राहुन संन्याशी, आखाडा आणि वारकरी परंपरा पुढे नेत आहेत. या कार्यक्रमामुळे देशभरातील साधु-संतांची व आलेल्या अतिथींची नाळ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींशी जोडली गेल्याचे महाराज म्हणाले. स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी माऊलींच्या प्रेमाचा धागा कधीही सैल होवू दिला नाही. परदेशातही त्यांनी माऊलींचे मंदिर बांधले असल्याचे त्यांनी सांगितले.

मंदिरं निर्माण करता येतील, दुधा-दह्याचे अभिषेकही घालता येतील, पण दीनदुबळ्यांना उभं करणारं मंदिर मात्र कोणालाही उभं करता येतं नाही. स्वामी गोविंददेव गिरिजी महाराजांनी मात्र हे कार्यही पूर्ण केल्याचे कृतार्थ भावही त्यांनी व्यक्त केले. स्वामीजींच्या कार्याचा सुवर्ण कलश म्हणजे अयोध्येतील श्रीराम मंदिर असल्याचे सांगत त्यांनी मंदिरासाठी झालेल्या पाचशे वर्षांच्या संघार्षावर प्रकाश टाकला. सहाव्या शतकांपासून आक्रमण झेलीत सोळाव्या शतकात संपूर्ण उध्वस्त झालेल्या राजा विक्रमादित्य निर्मित श्रीराम मंदिराच्या जागी आज पुन्हा भव्य आणि दिव्य मंदिर उभे राहीले. प्राणप्रतिष्ठेच्या दिव्य सोहळ्यातून अवघ्या जगाने प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. सुरुवातीपासूनच श्रीराम मंदिर आंदोलनाशी जोडलेल्या स्वामींच्या देखरेखीखाली उभे राहीलेले हे मंदिर देशाच्या संस्कृतीचे मंदिर असल्याचे गौरोद्गारही त्यांनी काढले.

Akurdi : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून जनसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा

अयोध्येत उभं राहिलेलं श्रीरामांचे मंदिर भारतीय संस्काराचे मंदिर असून त्यातून शिकण्यासारखे खूप काही आहे. दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी प्रभु श्रीरामाने राज्याचा त्याग केला हे रामचरित्र असून देशातील दीनदुबळा सुखाने कसा राहील याचा विचार म्हणजे रामायण असल्याचे त्यांनी सांगितले. दुसर्यासाठी आपल्या सुखाचा त्याग करणं हिच खरी रामाची पूजा असल्याचा भाव अयोध्येतील श्रीराम मंदिरातून मिळेल अशी आशा व्यक्त करताना आजच्या पिढीला हा स्वर्गीय सोहळा पाहण्याचे भाग्य मिळाले. आक्रमकांना देशातील मंदिरांची तोडफोड करता आली, मात्र भारतीयांची श्रद्धा मात्र त्यांना तोडता आली नाही. आज उभ्या राहिलेल्या भव्य श्रीराम मंदिरातून त्याचे प्रतिबिंब दिसल्याचे भावोद्गारही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी भास्करगिरि महाराजांचे आभार मानताना आळंदी हे आपल्या अंतःकरणाचा केंद्र असल्याची भावना प्रकट केली. परंतु आज प्रभु कृपेने आपल्या जीवनाचा फूटबॉल झाल्याचे मिश्मिलपणे सांगत आज आळंदीत तर उद्या अयोध्येत असा आपला पवास सुरु असल्याचे ते म्हणाले. जीवनाचा हा प्रवास अशाच पद्धतीने चालत रहावा यापेक्षा मोठी भाग्याची गोष्ट नाही. एकीकडे आळंदी आणि दुसरीकडे अयोध्या हे समाधान तृप्तीचे शिखर आहे. या तृप्तीचा एक उत्सव स्नेहीजणांनी आयोजित केला आणि देशातील संत-महंत त्यात सहभागी झाले, सूर्यरुपी भास्कर महाराजांच्या कीर्तन सेवेतून आपल्या अमृतमहोत्सवी वर्षात प्रकाश पडल्याचा भाव व्यक्त करताना स्वामीजींच्या डोळ्यात कृतार्थतेची आसवंही दाटली होती.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.