Alandi Theft : चोरीला जातील म्हणून ठेवायला घेतलेले दागिने लंपास

एमपीसी न्यूज – महिलेला दागिने चोरीला जातील आमच्याकडे ठेवण्यास द्या असे म्हणत विश्वास संपादन करून त्यानंतर दागिने न देता दागिन्यांचा अपहार व फिर्यादीची फसवणूक केली.  (Alandi Theft)या प्रकरणी आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आळंदी बस स्टॅन्ड ते इंद्रायणी पुलाच्या दरम्यान घडला.

18 जून रोजी फिर्यादी महिलेला आरोपीने गळ्यातील सोन्याची पोत व सोन्याचे वेल चोरीला जातील असे सांगितले तुम्ही आमच्याकडे ठेवायला द्या असे म्हणत तिचा विश्वास संपादन केला. महिलेनेही विश्वास ठेऊन आपले दागिने संबंधित व्यक्तीकडे दिले. त्यानंतर त्या व्यक्तींनी महिलेला दागिने परत न करता दागिन्यांचा अपहार व फसवणूक केली. या प्रकरणी अधिक तपास आळंदी पोलीस करीत आहेत.(Alandi Theft)

Chakan News: मद्यपी वाहन चालकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक, हवालदार, वॉर्डनला उडवले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.