Sangavi News: चारित्र्याच्या संशयातून पत्नीसह मुलांना मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज –  चारित्र्यावर संशय (Sangavi News) घेऊन पतीने पत्नीसह दोन्ही मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली. हा प्रकार 21 मे ते 1 जुलै 2022 या कालावधीत नवी सांगवी येथे घडला.
याप्रकरणी पीडित विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अभिजित मच्छिन्द्र ढोरे (रा. नवी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Corona Update: शहरात आज 212 नवीन रुग्णांची नोंद; 168 जणांना डिस्चार्ज

आरोपी पती अभिजित (Sangavi News) याने फिर्यादी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यावरून शारीरिक व मानसिक त्रास दिला. शिवीगाळ करून दोन्ही मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.  सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.