Pimpri Corona Update: शहरात आज 212 नवीन रुग्णांची नोंद; 168 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड  शहरातील कोरोनाच्या (Pimpri Corona Update) रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे. शहराच्या विविध भागातील 212  नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 62 हजार 486 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 127 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 81 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Lions Club: डॉक्टर्स डेचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ पुणे मार्फत मोफत वैद्यकीय मार्गदर्शन

तर,46 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये (Pimpri Corona Update) दाखल आहे. आज दिवसभरात 1 हजार 837 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 56 हजार 551 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.