Sidhu Musewala : पुण्यातील ‘त्या’ तिघांचेही बिश्नोई गॅंगशी संबंध, तिघांनाही होती सिद्धू मुसेवालाच्या खुनाची माहिती

एमपीसी न्यूज –  ओंकार बाणखेले आणि सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala)  खूनप्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव याला पुणे ग्रामीण पोलिसांनी रविवारी गुजरात राज्यातून अटक केली. यानंतर या प्रकरणात आता मोठमोठे खुलासे होऊ लागले आहेत. याप्रकरणात आतापर्यंत अटक केलेले सौरव महाकाल, संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी या तिघांचेही लॉरेन्स बिष्णोई गँगसोबत संबंध आहेत. या तिघांना मुसेवाला खुनासंदर्भात माहिती होती, असे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी सांगितले. त्याचबरोबर संतोष जाधवचा मित्र तेजस शिंदे हा देखील आरोपी असून पोलीस त्याचा शोध घेत आहोत, असेही त्यांनी सांगितले आहे.

Mahavitaran : पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क रहा; महावितरणचे आवाहन

 

पुणे पोलिसांनी रविवारी संतोष जाधव याला गुजरात राज्यातून अटक केली. सुरवातीला सौरव महाकाल याला अटक केली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत महाराष्ट्रात लॉरेन्स बिष्णोई गँगचे काही ग्रुप असल्याची माहिती मिळाली आहे. सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala)  हत्याप्रकरणी राज्यस्थान, दिल्ली, गुजरात येथे या आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना झाले होते. दरम्यान, अटक आरोपींचे लॉरेन्स बिष्णोईसोबत संबंध कसे आले याचा तपास करण्यात येईल, मुसेवाला खून प्रकरणात यांचा सहभाग नेमका आहे का, हे ही तपासले जाणार असल्याचे अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सरंगल यांनी सांगितले.

 

दरम्यान पुणे पोलिसांनी संतोष जाधव याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  गेल्या काही महिन्यांपासून तो फरार होता. रात्री उशिरा त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. संतोष जाधव हा सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala)  हत्याप्रकरणातील संशयित आरोपी आहे. 2021 साली पुण्यातील मंचरमध्ये झालेल्या ओंकार बाणखेले हत्याकांड प्रकरणी संतोष जाधवचा गेल्या काही महिन्यांपासून शोध सुरू होता. अखेर त्याच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.