Bhosari : बेस्ट इकोफ्रेण्डली गणेशोत्सव व बेस्ट गौरी स्पर्धा

माजी आमदार विलास लांडे यांची संकल्पना 

एमपीसी न्यूज – यंदाच्या गणेशोत्सवावर राज्यशासनाने लागू केलेल्या प्लास्टिक आणि थर्मोकोलबंदीमुळे बालगोपालांचा हिरमोड झाला आहे. पण पर्यावरणपूरक – इकोफ्रेंण्डली गणेशोत्सवाचे प्रबोधन ही  आवश्यक आहे. त्यासाठी भोसरी येथील नवमहाराष्ट्र तरुण मंडळाच्यावतीने  भोसरी आणि परिसरातील नागरिकांच्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे.  भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांच्या संकल्पनेतून बेस्ट इकोफ्रेंण्डली गणपती व बेस्ट गौरी या स्पर्धेमुळे आनंद द्विगुणित होणार आहे. 

भोसरी शहर व परिसरातील आळंदी, दिघी, मोशी, तळवडे, च-होली, चिखली, इंद्रायणीनगर, निगडी, नेहरुनगर, मासुळकर कॉलनी येथील सर्वच स्पर्धक सहभागी होऊ शकतात. बेस्ट इकोफ्रेण्डली गणेशोत्सव व बेस्ट गौरी या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गणपतीचे व सजावटीचे फोटो 7410021002 या क्रमांकावर व्हॉटसअपवर पाठवायचे आहे.

बेस्ट इको फ्रेण्डली गणेशोत्सव या स्पर्धेतील स्पर्धकांना इको फ्रेण्डली गणेशोत्सव  का साजरा करावासा वाटतो, आणि गणपतीचे विसर्जन कसे कराल, आणि बेस्ट गौरी स्पर्धेतील स्पर्धकांना गौरीदरम्यान आयोजित खेळ व उपक्रमांची माहिती थोडक्यात लिहुन पाठवायची आहे.  या स्पर्धेसाठी वयोमर्यादेचे बंधन नाही. स्पर्धेचा कालावधी दि. 13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत राहील.  प्रत्येक स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना नवमहाराष्ट्र तरुण मंडळाच्यावतीने चांदीच्या आकर्षक गणेशमूर्ती बक्षिस स्वरुपात देण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.