BFAC : पिंपरी चिंचवडच्या महिला संघाच्या दमदार कामगिरीने वर्ल्डकपमध्ये प्रवेश

एमपीसी न्यूज : युनायटेड स्पोर्ट्स सेन्टर, कक्करनाड, (BFAC) कोची केरळ येथे 11 ते 18 नोव्हेंबर IBSA ब्लाइंड फुटबॉल आशिया चॅम्पियनशीपचे आयोजन केले होते. आयोजक इंडिया आणि जपानची टीम यामध्ये दोन सामने झाले. दोन्ही सामन्यात जपानने भारताला मात दिली असली तरी उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय संघ 2023 साली बर्लिंगम, इंग्लंड येथे होणाऱ्या महिला वर्ल्डकपसाठी पात्र ठरला.

भारतीय संघाची कर्णधार दिपाली कांबळे हिच्या नेतृत्वात खेळताना सुरूवातीस लय हरवलेल्या संघाने नंतर मात्र आत्मविश्वासाने उत्तम खेळ करत जपान संघाला कडवी झुंज दिली.

Pune news: माननीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अहमदनगर ते नवीन आष्टी दरम्यान अतिरिक्त डेमू (DEMU) सेवांचे केले उदघाटन

कोमल गायकवाड, भाग्यश्री रूग्गी आणि दिपाली कांबळे यांना (BFAC)फेर प्ले अवॉर्ड मिळाला. जपानच्या किकी सुमारो स्वरा हिला बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंट अवॉर्ड मिळाला. भारतीय संघाचे प्रशिक्षक सुनील म्यॅथु आणि गोल गाईड विक्रम सिंग यांनी संघाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला.

वर्ल्डकप साठी पात्र झालेला संघ पुढील प्रमाणे:

दिपाली कांबळे, कर्णधार (महाराष्ट्र)

आशा मोतीराम (गुजरात)

कोमल गायकवाड (महाराष्ट्र)

मानसा (कर्नाटक)

पद्मिनी तुदू (ओडिसा)

शाहिस्ता (कर्नाटक)

आर सी विजयालक्ष्मी (तामिळनाडू)

यागम (कर्नाटक)

भागुष्री रूग्गी (महाराष्ट्र)

श्वेता (तामिळनाडू)

निर्मला बेन (गुजरात)

कांचन पटेल, गोलरक्षक

केरन, गोलरक्षक (तामिळनाडू)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.