Bharti Singh Arrested : कॉमेडीक्वीन भारती सिंहला ड्रग्जप्रकरणी ‘एनसीबी’कडून अटक

0

एमपीसी न्यूज – ड्रग्जप्रकरणी कॉमेडीक्वीन भारती सिंहला आंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) अटक केली आहे. तर भारतीचे पती, कॉमेडियन हर्ष यांची एनसीबीकडून चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान भारती आणि हर्ष दोघांनीही गांजाचं सेवन केल्याचं मान्य केलं असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे.

एनसीबीनं शनिवारी (दि. 21 ) कॉमेडियन भारती सिंह आणि तिचे पती हर्ष यांच्या मुंबईतील घरी छापा मारला. भारती आणि हर्षच्या घरी आणि ऑफिसमध्ये टाकलेल्या छाप्यात 86.5 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आल्याचीही माहिती एनसीबीनं दिली.

काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी देखील एनसीबीच्या टीमनं छापा टाकला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॅालीवूड मधील ब-याच कलाकारांची ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नावे समोर आली.

चौकशीदरम्यान सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांची नावं समोर आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III