Bhosari : भोसरीत गाड्यांची तोडफोड करत नागरिकांना लुबाडले

एमपीसी न्यूज –  दोन टवाळखोरांनी गाड्यांची तोडफोड करत तेथील ( Bhosari ) रिक्षा चालक व इतर वाहतूक व्यावसायीकांना लुबाडले आहे. हि घटना कासारवाडी येथे बुधवारी (दि.14) येथे रात्री घडली आहे.

याप्रकऱणी सुभाष बबन टोपे (वय 47 रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.15) फिर्याद दिली असून पोलिसांनी अमित बाळासाहेब पिसाळ (रा. कासारवाडी) व कौशल बाळासाहेब पिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pune : पुणे परिमंडळातील 34 लाख वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी 80 कोटींचा परतावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये येऊन दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने दगडाने गाड्याच्या काचा फोडल्या, तर फिर्यादी यांच्या खिशातून 1 हजार 700 रुपये बळजबरीने हिसकावून घेतले.

तसेच तेथील एका रिक्षाच्या गल्ल्यातून ही 475 रुपये काढून घेतले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावणरण असून अद्याप भोसरी पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. याचा पुढील तपास भोसरी पोलीस करत ( Bhosari )आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.