Pune : पुणे परिमंडळातील 34 लाख वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी 80 कोटींचा परतावा

एमपीसी न्यूज – महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या (Pune ) रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडळ अंतर्गत पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यातील 34 लाख 46 हजार 978 लघु व उच्चदाब वीजग्राहकांना 79 कोटी 96 लाख 36 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या विजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे.

विजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद  आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीज बिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना देण्यात  येते.

सन 2022-23 मध्ये पुणे परिमंडलातील 34 लाख 46 हजार 978 लघु व उच्चदाब विजग्राहकांना 79 कोटी 96 लाख 36 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. कृषिपंपधारक विजग्राहकांना त्रैमासिक वीजबिल देण्यात येत असल्याने त्यांच्या येत्या जून महिन्याच्या विजबिलात परताव्याची रक्कम समायोजित करण्यात येणार आहे.

Pune : पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा अपघात; एकाचा मृत्यू, नऊजण गंभीर जखमी

लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर 34 लाख 41 हजार 575 वीजग्राहकांना 39 कोटी 20 लाख रूपयांचा परतावा देण्यात आला आहे. यामध्ये पुणे शहरातील 17 लाख 84 हजार 36 ग्राहकांना 21 कोटी 60 लाख 90 हजार रुपयांचा, पिंपरी व चिंचवड शहरातील 7 लाख 88 हजार 910 वीजग्राहकांना 9 कोटी 22 लाख 87 हजार देण्याच आले आहे.

तर आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेलीतालुक्यातील 8  लाख 68 हजार 629 ग्राहकांना 8 कोटी 36 लाख 22 हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. तसेच पुणे परिमंडलातील उच्चदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक तसेच इतर 5 हजार 403 वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी 40 कोटी 76 लाख 35 हजार रुपयांचा परतावा विजबिलांमध्ये समायोजित करण्यात आला आहे.

पुणे परिमंडळातील विजग्राहकांना एप्रिल किंवा मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यास महावितरणकडून जास्तीत जास्त सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लघुदाब विजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in ही वेबसाईट व महावितरण मोबाईल ॲपद्वारे सोय उपलब्ध आहे. विजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून (Pune )करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.