Bhosari Crime: गांजा सेवन करणाऱ्या एकास अटक

एमपीसी न्यूज –  गांजा सेवन केल्याप्रकरणी एकाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. तर एकजण फरार झाला आहे. ( Bhosari Crime) ही कारवाई गुरुवारी (दि. 14) दुपारी सव्वादोन वाजता स्पाईन रोडवर घडली. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

लियाकत हुसेन जाकीर खान (वय 36रा. कुदळवाडीचिखली. मूळ रा. राजस्थान)तुकाराम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लियाकत याला अटक केली आहे. (Bhosari Crime) याप्रकरणी पोलीस नाईक दादा धस यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपी लियाकत याने तुकाराम याच्याकडून गांजा विकत आणला. तो त्याने स्पाईन रोडवरील मटेरियल गेटजवळ असलेल्या ओव्हर ब्रिजच्या खाली बसून सेवन केला. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून लियाकत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चार ग्राम गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य जप्त केले आहे.  या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.