Bhosari : तडीपार गुन्हेगार खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 5) बालाजीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.

दाद्या उर्फ कृष्णा गणेश भोसले (वय 20, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा याला पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तरीही तो कोणतीही परवानगी न घेता पुणे जिल्ह्यात आला. याबाबत माहिती पोलीस हवालदार अजय भोसले यांना मिळाली की, दाद्या भोसले भोसरी मधील बालाजीनगर झोपडपट्टी येथे थांबला आहे.  त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पुणे जिल्ह्यात येण्याची परवानगी नसल्याचे त्याने सांगितले. त्यावरून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, सहाय्यक पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, किरण काटकर, सागर शेडगे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.