Pimpri : जांभेकर पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्ष पदी गोविंद घोळवे

Govind Gholve as the state president of journalist's team

एमपीसी न्यूज – बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या राज्य अध्यक्ष पदी ज्येष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गोविंद घोळवे हे सध्या शिवसेनेचे राज्य संघटक म्हणून काम पाहत आहेत. बहुजन समाजातील झुंजार पत्रकार, नि:स्वार्थी स्पष्ट वक्ता म्हणून त्यांची ओळख आहे. अन्यायाविरुध्द त्यांनी आपल्या लेखणीतून नेहमीच आवाज उठविला आहे. संस्थापक-अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, सचिव नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष भगवान जाधव, अशोक पाटील, खजिनदार सुरेश सापळे यांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.