Pimpri : पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल असोसिएशनने महावितरणच्या अध्यक्षांची घेतली भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉं. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष संजीव कुमार यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेवून विविध प्रश्नांबाबत सखोल चर्चा केली.

यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर, सचिव नितीन बोंडे, उपाध्यक्ष जावेद मुजावर, उपाध्यक्ष मनोज हरपळे, आकाश भराटे, प्रदीप बेळगांवकर आदी उपस्थित होते.

यात महावितरणने जी ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे. त्यावर या बैठकीत समाधान व्यक्त केले आहे. तसेच ही ऑनलाईन प्रक्रिया कधी-कधी स्लो झाल्यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास होतो, याविषयी मत व्यक्त केले व त्यातील त्रुटीबाबत साधक-बाधक चर्चा केली. यावेळी मा. व्यवस्थापकीय संचालक यांनी ही ऑनलाईन प्रक्रिया येत्या वर्षात अजून चांगल्या प्रकारे काम करेल, असे आश्वस्थ केले असल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.

चर्चेदरम्यान 1.3% सुपरव्हिजन योजनेत महावितरण री स्ट्रक्चर करू पाहत आहे. त्याबाबत त्यांना असोसिएशनच्या विविध पदाधिकाऱ्यांनी छोट्या ठेकेदारांवर यामुळे संक्रांत येईल, त्यांना कामे मिळणे अवघड होईल. तसेच यामुळे फक्त मोठे ठेकेदार यांची चलती राहील, असे सांगितले. त्यावर मा. व्यवस्थापकीय संचालक यांनी आपली भीती व्यर्थ आहे. आपण याबाबत निर्धास्त रहा, कोणाचेही मी नुकसान होऊ देणार नाही. यामध्ये सर्व ठेकेदारांना सामाविले जाईल असे सांगितले. बैठकीत पुणे जिल्ह्यात मीटर्सचा असलेल्या तुटवड्याबाबत पदाधिकाऱ्यांनी विचारणा केली असता आधी तुटवडा होता. आता मात्र मीटर्स आलेले आहेत, असे सांगितले असल्याचे सचिव नितीन बोंडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

घटनेचे कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर यांच्या मालकीच्या मे. न्यू सिमरन इंटरप्रयाझेस या फर्मला महावितरण कंपनीचे पुणे मुख्य अभियंता यांनी लायसन्स रद्द करून कामबंदी आदेश लागू केला आहे. त्याबाबत पदाधिकाऱ्यांनी मा. व्यवस्थापकीय संचालक यांना लेखी निवेदन देत सदर प्रकरणी विचारले असता मा. व्यवस्थापकीय संचालक यांनी संतोष सौंदणकर यांचे लायसन्स पुनर्बहाल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून तात्काळ सूचना दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.