Hinjawadi : बालेवाडी स्टेडियममध्ये टोळक्याचा राडा

एमपीसी न्यूज – बालेवाडी स्टेडियम मध्ये आंदोलन आणि घोषणाबाजी करत स्टेडियम मधील स्टॉलची टोळक्याने तोडफोड केली. ही घटना शनिवारी (दि. 5) दुपारी सव्वातीनच्या सुमारास बालेवाडी स्टेडियमवर घडली.

प्रशांत लालसिंग धुमाळ (वय 36, रा. शिवाजी नगर गावठाण, पुणे) आणि अन्य दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत आणि त्याच्या साथीदारांनी बालेवाडी स्टेडियम येथे बेकायदेशीररित्या घोषणाबाजी आणि आंदोलन केले. तसेच लॉन टेनिस स्टेडियमच्या बाहेर असलेल्या प्रदर्शन स्टॉलमध्ये तोडफोड करून दोन हजार रुपयांचे नुकसान केले.

तसेच स्टेडियम मधील लॉन टेनिस ते शिवाजी पुतळा या मार्गावरील रस्ता अडवून प्रेक्षक, क्रीडा संकुलातील स्टाफ आणि राष्ट्रीय खेळाडूंना येण्या-जाण्यासाठी अडथळा निर्माण केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.