Pimpri : शहर भाजपच्या अनुसुचित महिला मोर्चा अध्यक्ष पदी कोमल शिंदे यांची नियुक्ती

 एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड भाजपच्या अनुसूचित महिला मोर्चा अध्यक्ष पदी कोमल शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच कोमल रमेश शिंदे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

यावेळी राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, युवा नेते अमित गोरखे, सरचिटणीस, प्रमोद निसळ, माजी महापौर आर.एस. कुमार आदी उपस्थित होते.

कोमल शिंदे यांचे चिंचवड परिसरात महिला वर्गांमध्ये चांगले काम आहे. विशेष करून आनंदनगर परिसरात त्यांनी अनेक लोक उपयोगी कामे केली आहेत. पथनाट्यातून समाज जागृतीसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.