Pune : ‘एमपीसी न्यूज’च्या राजकीय सल्लागार संपादकपदी गोविंद घोळवे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – मागील 14 वर्षांपासून पुणे, पिंपरी-चिंचवडकरांच्या सेवेत असलेल्या आणि देशातील न्यूज पोर्टलघ्या क्रमवारीत 125 व्या स्थानी असलेल्या ‘एमपीसी न्यूज’च्या (mpcnews.in) राजकीय सल्लागार संपादकपदी जेष्ठ पत्रकार गोविंद घोळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Sinhagad : सिंहगडावर पुन्हा एकदा मधमाशांचा हल्ला; दोन जण जखमी

‘एमपीसी न्यूज’च्या संचालक मंडळाच्या  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्य संपादक विवेक इनामदार तसेच संचालक लखपतराज मेहता व अनिल कातळे यांनी घोळवे यांचे स्वागत केले.

गोंविद घोळवे यांनी 1993 मध्ये पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. दैनिक लोकसत्तामध्ये त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. दैनिक पुढारीमध्ये बातमीदार ते ब्युरो चीफ पदावर त्यांनी काम केले. पुढारीच्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीचे 15 वर्षे प्रमुख म्हणून कामकाज पाहिले.

दैनिक सकाळच्या पिंपरी-चिंचवड आवृत्तीचे 6 वर्षे प्रमुख म्हणून कामकाज सांभाळले. सकाळ माध्यम समूहाचे राजकीय कार्यकारी संपादक म्हणून घोळवे यांनी काम केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे (मुंबई) सलग तीनवेळा ते बिनविरोध अध्यक्ष होते. ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनचे सलग दुसऱ्यावेळी ते अध्यक्ष आहेत.

मराठवाड्यातील श्री क्षेत्र भगवान गडाचे गेली 20 वर्षांपासून सचिव म्हणून घोळवे कामकाज पाहत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी घोळवे यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. आयएएस, आयपीएस, प्रशासनाच्या विविध विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उद्योजक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. अभ्यासू, स्पष्टवक्ते, निर्भीड, आक्रमक  पत्रकार म्हणून घोळवे यांची राज्यभरात ओळख आहे.

त्यांची ‘एमपीसी न्यूज’च्या राजकीय सल्लागार संपादकपदी निवड झाल्याने सर्व स्तरातून घोळवे यांचे अभिनंदन होत आहे. ‘एमपीसी न्यूज’ची व्याप्ती वाढवून मोठ्या प्रमाणात प्रसार  करण्याची जबाबदारी घोळवे यांच्यावर असणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्वांत पहिले ‘एमपीसी न्यूज’ पोर्टल आहे. पत्रकारितेतील 34 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार व हृषीकेश तपशाळकर यांनी हे मीडिया हाऊस सुरू केले आहे.

सर्वात अचूक, जलद आणि निष्पक्ष पत्रकारातीता करत ‘एमपीसी न्यूज’ने 14 वर्षांची वाटचाल पूर्ण केली आहे. मंथन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले हे महाराष्ट्रातील एकमेव न्यूज पोर्टल आहे.

जेष्ठ पत्रकार विवेक इनामदार मुख्य संपादक आहेत. इनामदार यांनी दैनिक लोकसत्तामध्ये 16 वर्षे काम केले. राज्यातील नामांकित एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये इनामदार यांनी चार वर्षे काम केले.

गोविंद घोळवे यांच्यामुळे एमपीसी न्यूजची प्रगती अधिक वेगाने होईल, असा विश्वास इनामदार यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.