Bhosari : वडमुखवाडीत कोरोना चाचणी शिबीर आयोजित करण्याची मागणी

वडमुखवाडी गावठाण, पदमावतीनगरीमध्ये लहान मुले, पुरुष, महिला, वृद्ध असे 35 ते 40 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. : Demand for corona test camp at Vadmukhwadi

एमपीसीन्यूज : चऱ्होली येथील वडमुखवाडी गावठाण, पदमावतीनगरीमध्ये लहान मुले, पुरुष, महिला, वृद्ध असे 35 ते 40 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील एक वृद्ध महिला व पुरुष यांचे निधन झाले आहे.  त्यामुळे या भागातील नागरिकांच्या कोरोना तपासणीसाठी मनपाच्या शाळेत तात्काळ कोरोना तपासणी शिबीर आयोजित करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते वैभव तापकीर यांनी केली आहे.

याबाबत तापकीर यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चऱ्होली येथील वडमुखवाडी गावठाण, पदमावतीनगरीमध्ये मागील 10 दिवसात लहान मुले,पुरुष,स्त्री, वृद्ध महिला व पुरुष असे 35 ते 40 जण कोरोना पोसिटिव्ह सापडले आहेत. त्यातील एक वृद्ध महिला व पुरुष यांचे निधन झालेले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मनपाने व आरोग्य विभागाने हा भाग तात्काळ कंटेनमेंट झोन घोषित करून तात्काळ रॅपिड टेस्ट चाचणी सुरु करावी. या भागातील सर्व परिसरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सोडियम हयाफोक्लोराईड ( जंतुनाशक ) औषध फवारणी करावी.

तसेच या भागातील नागरिकांना कोरोनाची लागण होणार नाही याची खबरदारी घेऊन या ठिकाणी असणाऱ्या मनपाच्या शाळेत रॅपिड टेस्ट चाचणी तपासणी शिबीर तात्काळ आयोजित करावे, अशी मागणी तापकीर यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.